Exim Bank Recruitment 2023 : भारतीय निर्यात-आयात बँकेत (Export-Import Bank of India) भरती सुरु झाली आहे (India Exim Bank Recruitment 2023). ह्या भरती प्रक्रियेअंतर्गत विविध पदांच्या 45 जागा भरण्यात येणार आहे. बँकेकडून ह्या बाबतची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. तुम्ही ही नोकरी करण्यासाठी इच्छुक असेल तर तुम्हाला लगेच अर्ज करावा लागणार आहे. कारण ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत 10 नोव्हेंबर 2023 पर्यंतच आहे. त्यामुळे तुमच्यालकडे अवघे काही दिवस शिल्लक आहेत. जाणून घेऊयात या भरतीविषयी अधिक माहिती…
Exim Bank Recruitment 2023 : भारतीय निर्यात-आयात (India Exim Bank) बँकेत भरती सुरु
भारतीय निर्यात-आयात बँक म्हणजे इंडिया Exim बँकेमध्ये भरती सुरु आहे. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक राहिला आहे. ऑनलाईन अर्ज केल्यानंतर काही दिवसांनी मुलाखतीद्वारे उमेदवाराची निवड केली जाणार आहे. या भरती मध्ये ऑनलाईन अर्ज कसा आणि कुठे करायचा? शैक्षणिक पात्रता काय आहे? जाणून घेऊयात ह्या बाबतची सविस्तर माहिती.
हे वाचा: SSC Recruitment 2023 : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत हवालदार पदांच्या 1558 जागांसाठी भरती सुरु.
India Exim Bank Recruitment 2023 : जाणून घ्या संपूर्ण अर्ज प्रक्रिया
पदांचा संपूर्ण तपशील पुढीलप्रमाणे
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या | शैक्षणिक पात्रता |
1 | मॅनेजमेंट ट्रेनी (बँकिंग ऑपरेशन्स) | 35 | 1) 60% गुणांसह पदवीधर
2) MBA/PGDBA (फायनान्स) /CA |
2 | मॅनेजमेंट ट्रेनी (डिजिटल टेक्नोलॉजी) | 07 | 60% गुणांसह B.E/B.Tech (कॉम्प्युटर सायन्स/IT/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन) किंवा 60% गुणांसह MCA |
3 | मॅनेजमेंट ट्रेनी (राजभाषा) | 02 | 1) 60% गुणांसह पदवीधर
2) हिंदी/इंग्रजी पदव्युत्तर पदवी |
4 | मॅनेजमेंट ट्रेनी (ॲडमिनिस्ट्रेशन) | 01 | 60% गुणांसह B.E/B.Tech (सिव्हिल/इलेक्ट्रिकल) किंवा हॉटेल & हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट /फॅसिलिट्स मॅनेजमेंट |
Total | 45 |
वयोमर्यादा :
अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 ऑक्टोबर 2023 पर्यंत 21 ते 28 वर्षे वर्षे या दरम्यान असणं आवश्यक आहे. तसेच मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना वयामध्ये 5 वर्षे सूट असणार आहे. तर OBC प्रवर्गातील उमेदवारांना वयामध्ये 3 वर्षांची सूट असणार आहे.
शुल्क :
हे वाचा: Indian Air Force Recruitment 2023 : भारतीय हवाई दलामध्ये भरती सुरु.
या भरती प्रक्रियेमध्ये भाग घेण्यासाठी जनरल आणि ओबीसी (OBC) या प्रवर्गातील उमेदवारांना सहाशे रुपये (₹600/-) शुल्क असणार आहे तर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना आणि महिलांना शंभर रुपये (₹100/-) शुल्क असणार आहे.
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
India Exim Bank Recruitment 2023 : अर्ज कसा आणि कुठे करायचा?
अधिकृत वेबसाईट – येथे पाहा (Click Here)
जाहिरात (Notification) – नोकरी संबंधितची अधिकृत जाहिरात येथे पाहा
ऑनलाईन अर्ज – येथे करा (Click Here)
India Exim Bank Recruitment 2023 : अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख –
वरील भरती प्रक्रियेत 10 नोव्हेंबर 2023 पर्यंत ऑनलाईन अर्ज दाखल करू शकता. तसेच मुलाखत डिसेम्बर 2023 मध्ये होणार आहे. या नोकरी संबंधिताच्या अधिक आणि सविस्तर माहितीसाठी कृपया वरती देलेली जाहिरात पाहा किंवा इथे क्लीक करा (Click Here).