Cheap Drugs : अनेकांचा महिन्याच्या पगारातील मोठा हिस्सा कुटुंबातील सदस्यांसाठी लागणाऱ्या औषधासाठी होतो. मधुमेह, रक्तदाबासारखा आजारांवरील औषधे, वेदनाशामक गोळ्या, अँटीबायोटिक्स, अँटिसेप्टिक्स आदी घराघरांत ठेवावे लागतात. दरम्याना सरकारने विविध अत्यावश्यक औषधांच्या किमती 1 एप्रिलपासून 12 टक्क्यांनी वाढवल्या आहेत. त्यामुळे औषधांवरील खर्चासाठी अधिक पैसे वेगळे काढावे लागतील. मात्र ही औषधे आणखी स्वस्तात मिळू शकतात. त्याबाबतचे विविध पर्याय सविस्तर जाणून घेऊयात..
जेनेरिक औषध केंद्र : जेनेरिक औषधे मूळ नावानेच विकली जातात. यात कोणताही ब्रँड नसतो. दर्जा आणि सुरक्षा तपासणी केल्यानंतर सरकारकडून या औषधांच्या उत्पादनाला परवानगी दिली जाते. मेडिकल स्टोअर्समध्ये मिळणाऱ्या औषधांच्या तुलनेत यांच्या किमती 10 ते 70 टक्के कमी असतात. ही औषधे सामान्य औषधांप्रमाणेच प्रभावी असतात.
हे वाचा: 11 मार्च 2023 : आज तुमचा दिवस कसा राहिल? वाचा…
ऑनलाईन खरेदी : गेल्या काही वर्षांपासून औषधांची विक्री ऑनलाईन सुरू झाली आहे. काही कंपन्यांनी यासाठी खास ॲप विकसित केले आहेत. या औषधांच्या किमतींवर घसघशीत सूटही दिली जाते. काही वेबसाईट्सवरही यांची विक्री केली जाते.
सरकारी रुग्णालय, आरोग्य केंद्रे : जवळ असलेल्या सरकारी दवाखाने, तसेच आरोग्य केंद्रांवर अत्यावश्यक औषधे हमखास मिळतात. ही औषधे मेडिकल स्टोअरच्या तुलनेत स्वस्त असतात.
मेडिकल स्टोअर्समध्ये सवलत : काही मेडिकल स्टोअर्समध्ये औषधांवर 15 ते 20 टक्क्यांपर्यंत सवलत दिली जाते. मात्र अशी दुकाने तुम्हाला शोधावी लागतील.
हे वाचा: पशुपालकांसाठी खुषखबर... दुधाळ गायींसाठी 70 तर म्हशींसाठी 80 हजार अनुदान
खरेदीवेळी काय काळजी घ्यावी? :
▪️ पक्के बिल तपासून घ्या.
▪️ पुरवठादारांचा परवाना क्रमांक तपासून घ्या. नसल्यास खरेदी करू नका.
▪️ उघडलेल्या पाकीटावरून लेबल चिटकवलेले पाकीट घेऊ नका.
▪️ उत्पादन तारीख आणि एक्सपायरी डेट तपासून घ्या.
▪️ चिठ्ठीवर लिहिलेल्या औषधाऐवजी पर्यायी औषध दिले, तर डॉक्टरांना विचारून सल्ला घ्या.