start this bussiness with high demand , low investment : नोकरी करता-करता जर तुम्हाला काही अतिरिक्त पैसे कमवायचे असतील तर आजकाल असे अनेक व्यवसाय आहेत. ज्यात तुम्ही हात आजमावू शकता. हे असे व्यवसाय आहेत जे अगदी कमी गुंतवणुकीत सुरू करता येतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला अशा व्यवसायाबद्दल सांगणार आहोत, जो फक्त 50 हजार रुपयांमध्ये सुरू केला जाऊ शकतो. यामध्ये अगरबत्ती बनवणे, लोणची बनवणे, टिफिन सेवा या सारख्या व्यवसायांचा समावेश आहे.
तुम्ही घरबसल्या लोणचे बनवण्याचा व्यवसाय सुरू करू शकता. यामध्ये सुरुवातीला तुम्हाला 10 हजार रुपये गुंतवावे लागतील. यामध्ये तुम्ही महिन्याला किमान 30 ते 35 हजार रुपये आणि वार्षिक लाखो रुपये कमवू शकता. तुम्ही लोणचे ऑनलाईन, घाऊक बाजार, किरकोळ बाजार किंवा किरकोळ साखळी पद्धतीने देखील विकू शकता.
हे वाचा: 2 मार्च 2023 : आज तुमचा दिवस कसा राहिल? वाचा…
अगरबत्ती बनवण्याचा व्यवसाय तुम्ही सुरू करू शकता. यासाठी अनेक प्रकारची यंत्रे वापरली जातात. यामध्ये मिक्सर मशीन, ड्रायर मशीन आणि मुख्य उत्पादन मशीन यांचा समावेश आहे. भारतामध्ये अगरबत्ती बनवण्याच्या मशीनची किंमत 35 हजार ते 1 लाख 75 हजार रुपयांपर्यंत आहे. या मशीनच्या मदतीने तुम्ही 1 मिनिटात 150 ते 200 अगरबत्ती बनवू शकता. जर तुम्ही हाताने अगरबत्ती बनवली तर तुम्ही 15 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत सुरुवात करू शकता. कच्चा माल अगरबत्ती बनवण्यासाठी साहित्य डिंक पावडर, चारकोल पावडर, बांबू, नर्गिस पावडर, सुगंधी तेल, पाणी, सुगंध, फुलांच्या पाकळ्या, चंदन, जिलेटिन पेपर, शॉ डस्ट, पॅकिंग साहित्य आवश्यक आहे. कच्च्या मालाच्या पुरवठ्यासाठी तुम्ही बाजारातील चांगल्या पुरवठादारांशी संपर्क साधू शकता.
दरम्यान कोणताही व्यवसाय सुरू करण्यासाठी केंद्र सरकारच्या अनेक योजना आहेत. ज्याद्वारे तुम्ही घरबसल्या व्यवसाय सुरू करू शकता. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी 900 चौरस फूट क्षेत्रफळ असणे आवश्यक आहे. लोणची तयार करणे, लोणचे सुकवणे, लोणचे पॅकिंगसाठी मोकळी जागा लागते. लोणचे जास्त काळ खराब होऊ नये म्हणून हे अत्यंत स्वच्छतेने बनवले जाते.
टिफिन सेवा व्यवसाय गृहिणी सुरू करू शकतात. याची सुरुवात तुम्ही तुमच्या घरापासूनच करू शकता. याची सुरुवात 8 ते 10 हजार रुपयांमध्ये करता येईल. जर लोकांना तुमचे जेवण आवडत असेल तर तुम्ही दर महिन्याला 1 ते 2 लाख रुपये कमवू शकता. आजकाल अनेक स्त्रिया घरबसल्या हा व्यवसाय करून चांगली कमाई करत आहेत. त्याचे मार्केटिंग सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे सहज करता येते. तुम्ही फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पेज तयार करू शकता, तुमची मार्केटिंग करु शकता.