How many days are banks closed in April? : येत्या 1 एप्रिलपासून नवे आर्थिक वर्ष सुरू होईल. या नव्या आर्थिक वर्षात 2023-24 पासून काही मोठे बदल होतील. जर विचार केला तर विशेषतः एप्रिल महिन्यामध्ये बँकेत अनेक महत्त्वाची कामे असतात. त्यामुळे या महिन्यात बँका किती दिवस बंद राहतील? याबाबत पुरेशी माहिती असणे आवश्यक आहे. एप्रिल महिन्यात येणाऱ्या सणांचा विचार करता एकूण 11 दिवस बँका बंद राहणार आहेत. या सर्व सुट्टया विविध राज्यांनुसार कमी-अधिक आहेत. एप्रिल महिन्यातील सुट्टयाची सुरुवात 1 एप्रिलपासून होईल. या दिवशी आर्थिक वर्षाचा पहिला दिवस असल्याने बँकांना सुट्टी असेल. त्यानंतर विविध सुट्टयांमुळे बँका 11 दिवस बंद राहतील. चला, तर सुट्ट्यांच्या यादीवर नजर टाकूयात…
2 एप्रिल : रविवार
4 एप्रिल : भगवान महावीर जयंती
7 एप्रिल : गुड फ्रायडे
8 एप्रिल : दुसरा शनिवार
9 एप्रिल : रविवार
14 एप्रिल : भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती
16 एप्रिल : रविवार
22 एप्रिल : रमजान ईद, दुसरा शनिवार
23 एप्रिल : रविवार
30 एप्रिल : रविवार
हे वाचा: इन्शुरन्सचा हप्ता कसा कमी करायचा? जाणून घ्या सोपे मार्ग