Sunday , 24 November 2024
Home Uncategorized Income Tax Refund :इन्कम टॅक्स रिफंडचा मेसेज.. तुमचं खातं होईल रिकामं, समजून घ्या प्रकरण…
Uncategorized

Income Tax Refund :इन्कम टॅक्स रिफंडचा मेसेज.. तुमचं खातं होईल रिकामं, समजून घ्या प्रकरण…

incometax

Income Tax Refund :सायबर गुन्हेगार लोकांची फसवणूक करण्यासाठी कोणती नवीन पद्धत शोधतील, याचा काही नेम नाही. कधी ते बँक अधिकारी असल्याची सांगतील तर कधी थेट लोकांच्या बँक खात्यात घुसण्याचा प्रयत्न करतील, तर कधी अन्य मार्गाने पैसे हडप करण्याचा प्रयत्न करतील. आता यात आणखी एका नव्या पद्धतीची भर पडली आहे. त्यानुसार सायबर गुन्हेगार आता आयकर रिफंड मिळवून देण्याच्या बहाण्याने आयकर भरणाऱ्यांची फसवणूक करण्याचा डाव आखत आहेत. आयकर रिफंडच्या नावाखाली करदात्यांना बनावट ईमेल (आयकर विभाग बनावट ईमेल) आणि एसएमएस मोठ्या प्रमाणात केले जात आहेत. रिफंड मिळविण्यासाठी तुम्ही चुकून मेलमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक केले तर तुम्हीही मोठ्या सायबर फसवणुकीला बळी पडू शकता.

आयकर विभागाच्या अधिकृत ई-मेल आणि वेबसाईट प्रमाणेच नावांसह संदेश पाठवले जात आहेत. तुम्हालाही रिफंड मिळवण्यासाठी असा ई-मेल किंवा एसएमएस येत असल्यास, तुम्हीही सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. अशा कोणत्याही मेल किंवा एसएमएसवर डोळे झाकून विश्वास ठेवणे म्हणजे आपल्या पायावर कुऱ्हाड मारण्यासारखेच आहे.

हे वाचा: आधार कार्डवर फसवणूक होऊच शकत नाही, नवीन सेफ्टी फिचर लॉंच

एका वृत्तानुसार, आयकर रिफंड देण्याच्या नावाखाली लोकांनाठी मेसेज पाठवले जात आहेत. हा मेसेज म्हणजे एक प्रकारचा सापळा असल्याचे सायबर तज्ज्ञांचे म्हणणे आहे. जर कोणी त्याच्या जाळ्यात अडकले तर तो मोठ्या फसवणुकीला बळी पडू शकतो, एवढं नक्की. कर तज्ज्ञ मनोज पाहवा सांगतात की, केवळ ई-मेलच नाही तर आयटी रिफंडचे बनावट एसएमएस आणि व्हॉट्सअॅपद्वारे लोकांना अडकवण्याचा प्रयत्न केला जात आहे.

सायबर तज्ञ म्हणतात की अशा मेसेजकडे लक्ष देऊ नका. तसेच कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करू नका. कारण एक छोटीशी चूक देखील तुम्हाला महागात पडू शकते. तुम्हाला हे माहित असले पाहिजे की आयकर विभाग कोणत्याही आयकर दात्याला ई-मेल किंवा एसएमएसद्वारे कोणतीही लिंक पाठवत नाही.

बनावट संदेश कसे ओळखायचे? : तुम्हाला मेसेजमध्ये येणाऱ्या ई-मेलचे डोमेन नाव काळजीपूर्वक तपासा. बनावट ई-मेलमध्ये शुद्धलेखनाच्या चुका असतील किंवा आयकर विभागाच्या वेबसाईटचे चुकीचे स्पेलिंग असेल. ई-मेलचे टायटल चुकीचे असू शकते. त्याचप्रमाणे वेबसाईटची लिंक शॉर्ट फॉर्ममध्ये असू शकते. सर्वात मोठी ओळख म्हणजे आयकर विभागाकडून येणार्‍या कोणत्याही मेसेजमध्ये तुम्हाला लिंकवर क्लिक करून तुमची वैयक्तिक माहिती भरण्यास सांगितले जाणार नाही.

हे वाचा: How To Season 3: When Expectations Don’t Meet Reality

अशी मिळवा रिफंडची माहिती : तुम्हाला कोणतीही माहिती मिळवायची असल्यास, आयकर वेबसाईट https://www.incometaxindiaefiling.gov.in वर लॉग इन करून थेट मिळवा. जर तुम्ही कर भरला आणि तुमचा परतावा आला नाही, तर यासाठी सर्वात सुरक्षित मार्ग म्हणजे तुमची स्थिती तपासणे. हा फक्त आयकरच्या अधिकृत वेबसाईटवर लॉग इन करून किंवा तुम्हाला काही संवाद साधायचा असेल तर या वेबसाइटद्वारे करा म्हणजे फसवणूक होणार नाही.

Related Articles

Uncategorized

Diwali Ank 2024: आकर्षक कथा आणि प्रेरणादायक लेखांचा संग्रह!

Diwali ank 2024 | दिवाळी अंक 2024: मराठी साहित्याचा उत्सव दिवाळी म्हणजे...

SSC GD Constable Recruitment 2024
Uncategorized

SSC GD Constable Recruitment 2024 : SSC मार्फत GD कॉन्स्टेबल पदाच्या 26 हजार 146 जागांसाठी मेगा भरती सुरु; असा करा अर्ज

SSC GD Constable Recruitment 2024 : तरुणांसाठी सरकारी नोकरी करण्याची मोठी संधी...

G20-SUMMIT-2023
Uncategorized

G20 Summit 2023 : G20 परिषद

G20 Summit 2023 – आजपासून दिल्लीत G20 परिषद सुरु झाली. कोण कोणते...

Pradhan Mantri Garib Kalyan Anna Yojana
Uncategorized

Pradhan Mantri Garib Kalyan Anna Yojana : प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना.

Pradhan Mantri Garib Kalyan Anna Yojana ; पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना...