भारतातील बेस्ट स्मार्टफोन्स, कमी किंमत आणि दमदार फिचर्स, पाहा यादी…
सोशल मीडियाच्या आणि तंत्रज्ञानाच्या या युगात स्मार्टफोन आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनलाय. आजघडीला बाजारात अनेक हँडसेट उत्पादक आहेत, जे बजेटमध्ये स्मार्टफोन ऑफर करत आहेत. आजच्या लेखामध्ये आम्ही तुम्हाला भारतात उपलब्ध असलेल्या काही बजेट फ्रेंडली स्मार्टफोन्सबद्दल माहितती देणार आहोत. 20 हजार रुपयांच्या खालील बेस्ट स्मार्टफोन Xiaomi, Motorola, Samsung सारख्या ब्रँड्सकडून ऑफर केले जात आहेत. या स्मार्टफोन्समध्ये तुम्हाला FHD+ डिस्प्ले, फास्ट चार्जिंग, USB Type-C कनेक्शन, उत्कृष्ट कनेक्टिव्हिटी, उत्तम कॅमेरा आणि इतर अनेक दमदार फीचर्स मिळतात. त्याबद्दल अधिक सविस्तर जाणून घेऊयात…
हे वाचा: 31th March 2023 : येत्या 31 मार्चपूर्वी 'ही' कामे करा, अन्यथा मोठे नुकसान होईल!
OnePlus Nord CE 2: हा स्मार्टफोन Qualcomm चा Snapdragon 695 5G प्रोसेसर 6GB पर्यंत RAM सह मिळतो. यामध्ये 64MP प्राथमिक कॅमेरा कॅमेरा आहे. तर या फोनची किंमत 18 हजार 999 रुपये एवढी आहे.
Redmi Note 11 Pro: या स्मार्टफोनमध्ये 6.67-इंचाचा FHD + 120Hz AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. तर या स्मार्टफोनला कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 च्या डिस्प्लेचे संरक्षण देण्यात आले आहे. यामध्ये 5000mAh बॅटरी आहे. वेगवान चार्जरसह, तुम्ही 15 मिनिटांपेक्षा कमी वेळात 50 टक्क्यांपर्यंत बॅटरी चार्ज करू शकता. तर या फोनची किंमत 19 हजार 999 रुपये एवढी आहे.
iQOO Z6 Lite 5G: हा स्मार्टफोन स्नॅपड्रॅगन 4 Gen 1 प्रोसेसरद्वारे समर्थित आहे आणि त्याचा रिफ्रेश दर 120Hz आहे. हा स्मार्टफोन गेमिंगसाठी बेस्ट आहे. 50MP आय ऑटोफोकस प्राथमिक कॅमेरा या फोनला उत्कृष्ट कॅमेरा स्मार्टफोन बनवतो. या स्मार्टफोनची किंमत 13 हजार 999 रुपये एवढी आहे.
हे वाचा: Horoscope 23 February 2023 : आज तुमचा दिवस कसा राहिल? वाचा…
Samsung Galaxy M13: हा स्मार्टफोन 6000mAh बॅटरीसह येतो. तर तो ग्रीन, ब्राऊन, डार्क ब्लू आणि लाइट ग्रीन कलर व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहेत. त्याचा 50MP+5MP+2MP चा तिहेरी कॅमेरा सेटअप उत्कृष्ट चित्र क्वालिटी देतो. या फोनची किंमत 12 हजार 999 रुपये एवढी आहे.