firefighter recruitment : जर तुम्ही सैन्य भरतीची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. ती म्हणजे भारतीय सैन्य दलाकडून अग्निवीर भरती प्रक्रियेत मोठा बदल करण्यात आला आहे. आता भरती प्रक्रिया काही नवीन निकषांवर होणार आहे. यामध्ये शारीरिक आणि मानसिक रित्या सुदृढ असणाऱ्या उमेदवारांची निवड केली जाईल. त्यासाठी लेखी प्रवेश परीक्षेमध्ये काही बदल करण्यात आले. भारतीय सैन्यदलाकडून याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे.
सैन्य दलाकडून सांगण्यात आलं आहे की, यापुढे अग्निवीर भरतीसाठी मानसिकदृष्ट्या मजबूत उमेदवारांची निवड करण्यावर भर देण्यात येईल. याबाबत भारतील लष्करातील भरती प्रक्रियेतील अधिकारी कर्नल जी. सुरेश यांनी म्हणाले, की सैन्य दलाच्या भरती प्रक्रियेत आधी शारीरिक चाचणी आणि त्यानंतर शेवटी लेखी परीक्षा घेतली जात होती. मात्र आता लेखी परीक्षा ही भरती प्रक्रियेतील पहिली पायरी असेल. भरती होणारे उमेदवार शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या मजबूत आहेत का? हे तपासून पाहिले जाणार आहे. लेखी परीक्षेनंतर शारीरिक आणि वैद्यकिय चाचणी घेण्यात येईल.
हे वाचा: 7 Steps to Get Professional Facial Results At Home
पुढे कर्नल सुरेश म्हणाले, अग्निवीर भरती प्रक्रियेत आणखी एक मोठा बदल करण्यात आला आहे. लेखी परीक्षेला बसण्यासाठी उमेदवारांना 500 रुपये शुल्क भरावं लागेल. या रकमेपैकी 250 रुपये भारतीय सैन्य देईल तर उमेदवाराला फक्त 250 रुपये भरावे लागतील. दरम्यान, अग्निवीर भरतीसाठी वर्षातून एकदाच ऑनलाईन नोंदणी करता येईल.
सुधारित भरती प्रक्रियेनुसार, भरतीपूर्वी संगणकावर आधारित ऑनलाईन कॉमन एंट्रन्स टेस्ट घेतली जाईल. अग्निवीर भरती प्रक्रिया आता तीन टप्प्यांमध्ये घेतली जाणार असून यामध्ये सीईई शारीरिक चाचणी आणि वैद्यकीय चाचणी घेतली जाईल. सध्या अग्निवीर म्हणून भरतीसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू झालीय. त्यामुळे हे नवीन बदल सर्वांपर्यंत पोहोचवा. त्यासाठी ही बातमी जास्तीत-जास्त लोकांपर्यंत शेअर करा.