Maharashtra Post Office Recruitment 2023 : आपण मागील पोस्टमध्ये भारतीय डाक विभागातील भरती विषयी माहिती जाणून घेतली. आज आपण भारतीय डाक विभागात महाराष्ट्र सर्कल मध्ये सुरु असलेल्या भरती विषयी माहिती पाहणार आहोत. पोस्ट विभागाच्या महाराष्ट्र सर्कलमध्ये देखील 3 हजार जागांपेक्षा अधिक जागांसाठी भरती सुरु झालेली आहे. ह्यामध्ये दहावी पास उमेदवार देखील अर्ज करू शकतात. जाणून घ्या या भरती विषयी अधिक माहिती.
Maharashtra Post Office Recruitment 2023 : महाराष्ट्र पोस्ट सर्कल भरती
भारतीय डाक विभागात 30 हजारांपेक्षा अधिक जागांवरती भरती सुरु झालेली आहे. या भरती मार्फतच महाराष्ट्र पोस्ट सर्कल मध्ये 3 हजार जागांसाठी भरती होणार आहे. ह्या भरतीमध्ये भाग घेण्यासाठी इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. पण या भरती मध्ये भाग घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज नेमका कसा आणि कुठे करायचा? शैक्षणिक पात्रता काय आहे? जाणून घेऊयात याबाबतची सविस्तर माहिती.
हे वाचा: SSC CPO Recruitment 2023 : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत मेगा भरती सुरु.
Maharashtra Post Office Recruitment 2023 : जाणून घ्या संपूर्ण अर्जप्रक्रिया
पदांबाबतचा संपूर्ण तपशील खालील प्रमाणे
पदांचे नाव :
- पद क्रमांक 1 : GDS-ब्रांच पोस्ट मास्टर (BPM)
- पद क्रमांक 2 : GDS-असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर
एकूण जागा : 3 हजार 154 जागा.
हे वाचा: Government Job : 'ही' सरकारी नोकरी करण्याची संधी; अर्ज कसा आणि कुठे करायचा? जाणून घ्या.
शैक्षणिक पात्रता :
- 10वी उत्तीर्ण
- मूलभूत संगणक प्रशिक्षण कोर्स प्रमाणपत्र.
वयाची अट :
या भरती प्रक्रियेत अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वयवर्ष 23 ऑगस्ट 2023 पर्यंत 18 ते 40 वर्षे या दरम्यान असणे आवश्यक आहे. SC आणि ST या प्रवर्गातील उमेदवारांना वयात 5 वर्षे सूट असणार आहे तर OBC प्रवर्गातील उमेदवारांना वयात 3 वर्षे सूट दिली जाणार आहे.
हे वाचा: Post Office Recruitment 2023 : डाक विभागाची महाराष्ट्र सर्कलमध्ये भरती सुरु
शुल्क :
या भरती प्रक्रियेमध्ये भाग घेण्यासाठी जनरल आणि ओबीसी (OBC) या प्रवर्गातील उमेदवारांना शंभर रुपये (₹100/-) शुल्क असणार आहे तर एससी (SC), एसटी (ST) आणि पीडब्ल्यूडी (PWD) अशा मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना आणि महिलांना कोणत्याही प्रकारचे शुल्क नाही.
नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र आणि गोवा
Maharashtra Post Office Recruitment 2023 : अर्ज कसा आणि कुठे करायचा?
अधिकृत वेबसाईट – येथे पहा
जाहिरात (Notification) – नोकरी संबंधितची अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज – येथे करा.
Maharashtra Post Office Recruitment 2023 : महत्वाच्या तारखा
वरील भरती प्रक्रियेत 23 ऑगस्ट 2023 पर्यंत ऑनलाईन अर्ज दाखल करू शकता. तसेच अर्ज संपादित (Edit) करण्याची तारीख 24 ते 26 ऑगस्ट 2023 पर्यंत आहे.
या नोकरी संबंधिताच्या अधिक सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.