Saturday , 21 December 2024
Home Jobs Forest Recruitment 2023 : महाराष्ट्र वन विभागात 2 हजाराहून अधिक जागांवर भरती सुरु
Jobs

Forest Recruitment 2023 : महाराष्ट्र वन विभागात 2 हजाराहून अधिक जागांवर भरती सुरु

Forest Recruitment 2023 : महाराष्ट्र वन विभागात 2 हजाराहून अधिक जागांवर भरती सुरु
Forest Recruitment 2023 : Letstalk

Forest Recruitment 2023 : सध्या खाजगी क्षेत्रातील नोकरी सुरक्षित राहिलेली नाही. त्यात आधी कोरोनामुळे आणि आता आर्थिकमंदीमुळे उद्योग धंद्यांना चांगलाच फटका बसला आहे. ह्याच कारणामुळे अनेकांना आपल्या नोकरीवर पाणी सोडावं लागलं आहे. आत्ता देखील अनेक खाजगी नोकरदारांना आपली नोकरी राहील कि नाही याची शाश्वती राहिलेली नाही. ह्याच कारणामुळे खाजगी नोकरीच्या मागे न लागता अनेक तरुणांचा सरकारी नोकरीकडे कल वळला आहे. त्यादृष्टीने त्यांची तयारी देखील सुरु आहे. आता अशाच सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी अतिशय महत्वाची बातमी आहे. महाराष्ट्र वन विभागात 2 हजाराहून अधिक जागांवर भरती सुरु झाली आहे. या भरती प्रक्रियेअंतर्गत अनेक महत्वाची पदे भरली जाणार आहे. त्यामुळे तरुणांना व माजी सैनिकांना सरकारी नोकरी करण्याची सुवर्णसंधी आहे. जाणून घ्या या भरती बाबतची सविस्तर माहिती..

Forest Recruitment 2023 : महाराष्ट्र वन विभागात भरती सुरु 

महाराष्ट्राच्या वन विभागामध्ये जवळपास अडीच हजार विविध पदांसाठी भरती सुरु झाली आहे. या बाबतची जाहिरात महाराष्ट्राच्या वन विभागाने प्रसिद्ध केली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये दहावी बारावी उत्तीर्णापासून ते पदवीधर इंजिनीर पर्यंत तरुणांना अर्ज करता येणार आहे. त्यामुळे अनेक कौशल्यवान तरुणांना सरकारी नोकरी करून भविष्य घडविण्याची एक उत्तम संधी आहे. पण या भरतीमध्ये भाग घ्यायचा असेल तर तुम्हाला ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. भरती बाबतची सविस्तर माहिती खालील प्रमाणे…

हे वाचा: IBPS Clerk Recruitment 2023 : IBPS मार्फत 4 हजाराहून अधिक जागांसाठी भरती सुरु; अर्ज कसा करायचा? पाहा.

भरती बाबतची संपूर्ण माहिती :

महाराष्ट्र वन विभागामध्ये विविध पदांच्या जवळपास 2 हजार 417 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत (Forest Recruitment 2023). महाराष्ट्राच्या वन विभागाने जाहिरातीमध्ये दिलेल्या माहितीनुसार या भरती प्रक्रियेमध्ये भाग घेण्यासाठी अर्ज कसा आणि कुठं करायचा? पात्रता काय? याबातची सर्व माहिती खालील प्रमाणे देण्यात आली आहे.

Forest Recruitment 2023 : पदाचे नाव आणि पदसंख्या

पद.क्र पदाचे नाव शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा
(वय वर्ष 30 जून 2023 पर्यंत)

पदसंख्या

1 वनरक्षक (गट क) 12वी (विज्ञान/गणित/भूगोल/अर्थशास्त्र) उत्तीर्ण किंवा अनुसूचित जमाती प्रवर्ग – 10वी उत्तीर्ण 18 ते 27 वर्षे 2138
2 लेखापाल (गट क) पदवीधर 21 ते 40 वर्षे 129
3 सर्वेक्षक (गट क) 1) 12वी उत्तीर्ण

2) सर्वेक्षक प्रशिक्षण पाठ्यक्रम प्रमाणपत्र

18 ते 40 वर्षे 86
4 लघुलेखक (उच्चश्रेणी) (गट ब) 1) 10वी उत्तीर्ण

हे वाचा: SBI Clerk Recruitment 2023 : भारतीय स्टेट बँकेमध्ये लिपिक पदांच्या 8 हजार 283 जागांसाठी भरती सुरु.

2) लघुलेखन 120 श.प्र.मि.

3) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.

18 ते 40 वर्षे 13
5 लघुलेखक (निम्नश्रेणी) (गट ब) 1) 10वी उत्तीर्ण

2) लघुलेखन 100 श.प्र.मि.

हे वाचा: Exim Bank Recruitment 2023 : भारतीय निर्यात-आयात (India Exim Bank) बँकेत भरती सुरु; अर्ज कसा करायचा?

3) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.

18 ते 40 वर्षे 23
6 कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) (गट ब) सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा (स्थापत्य अभियांत्रिकी पदविका) 18 ते 40 वर्षे 08
7 वरिष्ठ सांख्यिकी सहाय्यक (गट क) गणित, अर्थशास्त्र, वाणिज्य, कृषी, किंवा सांख्यिकी पदव्युत्तर पदवी किंवा द्वितीय श्रेणीतील पदवी 18 ते 40 वर्षे 05
8 कनिष्ठ सांख्यिकी सहाय्यक (गट क) गणित, अर्थशास्त्र, वाणिज्य, कृषी, किंवा सांख्यिकी पदवी 18 ते 40 वर्षे 15
एकूण जागा : 2417

वयाची अट :

वयाची आत ही पादनानुसार वेगवेगळी असणार आहे. तसेच या भरती प्रक्रियेत अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वयवर्ष 30 जून 2023 पर्यंत सरासरी 18 ते 40 वर्षे या दरम्यान असणे आवश्यक आहे. तर SC आणि ST या प्रवर्गातील उमेदवारांना वयात 5 वर्षे सूट असणार आहे. तरीही वयाच्या संपूर्ण माहितीसाठी कृपया एकदा जाहिरात पहा. तसेच वरच्या तक्त्यातील माहिती पहा.

शुल्क :

खुल्या प्रवर्गासाठी 1000 रुपये शुल्क असणार आहे तर राखीव प्रवर्गासाठी 900 रुपये शुल्क असणार आहे. तसेच माजी सैनिकांसाठी कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही.

नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्रात कुठेही

Forest Recruitment 2023 : अर्ज कसा आणि कुठे करायचा?

अधिकृत वेबसाईट – येथे पहा 

जाहिरात (Notification) – नोकरी संबंधितची अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लीक करा 

ऑनलाईन अर्ज – येथे Click करा. 

Forest Recruitment 2023 : महत्वाच्या तारखा

महाराष्ट्रत वन विभागाच्या वरील भरती प्रक्रियेत भाग घेण्यासाठी तुम्हाला 30 जून 2023 पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. त्यानंतरचे अर्ज स्वीकारले जाणार नाही. त्यामुळे अर्ज वेळेआधीच भरले तर फायद्याचं ठरणार आहे. तसेच या भरती प्रक्रियेसाठी परीक्षा कधी होणार आहे याबाबतची तारीख महाराष्ट्र वन विभागाकडून नंतर कळविण्यात येणार आहे.

तुम्हाला या भरती बाबतची अधिक आणि सविस्तर माहिती पाहिजे असल्यास तुम्ही वर दिलेली जाहिरात पाहू शकता. 

Related Articles

MUCBF Recruitment 2024
Jobs

MUCBF Recruitment 2024 : बँकेत नोकरी करण्याची संधी; अर्ज कसा आणि कुठे करायचा? जाणून घ्या

MUCBF Recruitment 2024 : तरुणांना बँकेत नोकरी करण्याची मोठी संधी आहे. महाराष्ट्र...

AIIA Recruitment 2024
Jobs

AIIA Recruitment 2024 : अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेमध्ये भरती सुरु; असा करा अर्ज.

AIIA Recruitment 2024 : तरुणांना नोकरी करण्याची संधी आहे. आखिल भारतीय संस्थेमध्ये...

BIS Recruitment 2024
Jobs

BIS Recruitment 2024 : भारतीय मानक ब्यूरो मध्ये भरती सुरु; अर्ज कसा आणि कुठे करायचा? जाणून घ्या

BIS Recruitment 2024 : तरुणांना सरकारी नोकरी करण्याची महत्वाची संधी आहे. भारतीय...

SBI Clerk Recruitment 2023
Jobs

SBI Clerk Recruitment 2023 : भारतीय स्टेट बँकेमध्ये लिपिक पदांच्या 8 हजार 283 जागांसाठी भरती सुरु.

SBI Clerk Recruitment 2023 : बँकेमध्ये नोकरी करण्याचं स्वप्न असणाऱ्या तरुणांसाठी भारताची...