31th March 2023 : अवघ्या काही दिवसांनी चालू वित्त वर्ष (2022-23) संपेल. तर येत्या 1 एप्रिल 2023 पासून नवे वित्त वर्ष सुरू होईल. चालू वित्त वर्षातील अग्रिम कर (ऍडव्हान्स टॅक्स) जमा करण्यासह अनेर कामे 31 मार्च पूर्वी करणे आवश्यक आहे. त्यावर एक नजर टाकूयात…
आधार-पॅन जोडणी : येत्या 31 मार्चपूर्वी आपले पॅन कार्ड आधारशी जोडून घ्या. अन्यथा तुमचे पॅन कार्ड अकार्यरत (डी ऍक्टिव्हेट) होईल. तसेच 31 मार्चनंतर जोडणी केल्यास 1 हजार रुपयांचा दंड लागेल.
हे वाचा: 20 फेब्रुवारी 2023 : आज तुमचा दिवस कसा राहील? वाचा…
फॉर्म 12 बीबी : गुंतवणुकीवरील कर सवलतीसाठी वेतनधारक कर्मचाऱ्यांनी कंपनीला फॉर्म 12 बीबी 31 मार्चपूर्वी भरून द्यावा. यात एचआरए, एलटीसी आणि गृहकर्ज यांची माहिती दिली जाऊ शकते.
सुधारित आयटीआर : आढावा वर्ष 2020-21 साठी सुधारित आयकर विवरणपत्र (आयटीआर) 31 मार्चपूर्वी भरणे आवश्यक आहे. जर आयटीआर भरले नसेल अथवा त्यात त्रुटी असतील, तर सुधारित आयटीआर वेळीच भरा.
अग्रीम कर : 10 हजार रुपयांपेक्षा अधिक कर देयता असलेल्या करदात्यांना वर्षातून 4 वेळा आगाऊ कर भरावा लागतो. आगाऊ कराचा चौथा हप्ता 31 मार्चपूर्वी भरणे आवश्यक आहे.
हे वाचा: Debt Market : गुंतवणुकीची संधी शोधताय? डेट मार्केटबद्दल वाचून तुमचा शोध संपेल..
कर बचत गुंतवणूक : वित्त वर्ष 2022-23 साठी जुन्या कर व्यवस्थेत कर सवलत प्राप्त करण्यासाठी 31 मार्चपूर्वी गुंतवणूक करणे आवश्यक आहे. पीपीएफ, ईएलएसएस, युलिप, एनपीएस इत्यादी योजनांमध्ये सदर गुंतवणूक केली जाऊ शकते.
टीडीएसचे नियम 1 एप्रिलपासून बदलणार आहेत :
a.ऑनलाईन गेमिंग, गॅम्बलिंग, बॅटिंग, फॅंटसी स्पोर्ट्स या सर्वांत जिंकलेल्या रकमेवर सरसकट टीडीएस कपात होणार आहे.
b.मार्केट लिंकड डिबेंचरच्या व्याज भरण्यावर मिळणाऱ्या टीडीएस कपातील सवलत संपेल.
c.ईपीएफ काढताना पॅन क्रमांक न दिल्यास 20 टक्के टीडीएस लागणार.
d.एनआरआय आणि विदेशी कंपन्यांना केलेल्या अदायगीवर 20 टक्के टीडीएस लागेल.
e.विदेशी समभागातील गुंतवणूक आणि रेमिटोन्स यावरील टीडीएस 5 टक्क्यांवरून 20 टक्के होईल.
7) सोने खरेदी : येत्या 31 मार्चनंतर 4 अंकी हॉलमार्क असलेले दागिने विकता येणार नाही. 1 एप्रिल 2023 पासून केवळ 6 अंकी हॉलमार्क असलेले दागिने विकता येतील.
हे वाचा: Summer Fridge : उन्हाळ्याचा फ्रीज