Post Office Recruitment 2023 : एकीकडे आर्थिक मंदीमुळे अनेक मोठ्या कंपन्या आपला आर्थिक समतोल राखण्यासाठी नोकर कपातीसारखा मोठा निर्णय घेत आहेत. त्यामुळे अनेक कौशल्यवान तरुणांना आपल्या नोकरीवर पाणी सोडावं लागलं आहे. तर दुसरीकडे सरकारी तसेच सरकार नियंत्रित असलेल्या कंपन्यांमध्ये नोकरीच्या अनेक संधी उपलध होत आहे. त्यामुळे शिक्षण कमी असलेल्यांपासून पदवीधर ते उच्च शिक्षित असलेल्या तरुणांसाठी सरकारी नोकरी करण्याची उत्तम संधी मिळते.
डाक विभागाची महाराष्ट्र सर्कलमध्ये भरती सुरु :
शिक्षण कमी असणाऱ्या विद्यार्थी आणि तरुणांसाठी सरकारी नोकरी करण्याची मोठी संधी आहे. भारतीय डाक विभागाच्या महाराष्ट्र सर्कलमध्ये जवळपास सहाशे रिक्त जागांवाती भरती सुरु झाली आहे. या भरती प्रक्रियेत शिक्षण पात्रता अगदी दहावी पास पर्यंत असणं गरजेचं आहे. त्यामुळे ही सरकारी नोकरी तुम्हाला मिळू शकते पण त्यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा आहे. भरती बाबतची सविस्तर माहिती खालील प्रमाणे…
हे वाचा: AHD Maharashtra Recruitment : महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागात भरती सुरु; असा करा अर्ज.
Post Office Recruitment 2023 : भरती बाबतची संपूर्ण माहिती :
भारतीय डाक विभागाच्या महाराष्ट्र सर्कलमध्ये जवळपास 600 रिक्त जागांवरती भरती सुरु झाली आहे. या भरती बाबतची अधिकृत जाहिरात भारतीय डाक विभागाने प्रसिद्ध केली आहे. भारतीय डाक विभागाने जाहिरातीमध्ये दिलेल्या माहितीनुसार दिलेल्या माहितीनुसार या भरती प्रक्रियेमध्ये भाग घेण्यासाठी अर्ज कसा आणि कुठं करायचा? पात्रता काय? याबातची सर्व माहिती खालील प्रमाणे देण्यात आली आहे.
Post Office Recruitment 2023 : पदाचे नाव आणि पदसंख्या
पदाचे नाव : ग्रामीण डाक सेवक – GDS
1) GDS – ब्रांच पोस्ट मास्टर (BPM)
2) GDS – असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM)
हे वाचा: BIS Recruitment 2024 : भारतीय मानक ब्यूरो मध्ये भरती सुरु; अर्ज कसा आणि कुठे करायचा? जाणून घ्या
एकूण जागा : 620 जागा.
शैक्षणिक पात्रता :
1) दहावी पास
2) मूलभूत संगणक प्रशिक्षण कोर्स प्रमाणपत्र.
वयाची अट :
या भरती प्रक्रियेत अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वयवर्ष 11 जून 2023 पर्यंत 18 ते 40 वर्षे या दरम्यान असणे आवश्यक आहे. SC आणि ST या प्रवर्गातील उमेदवारांना वयात 5 वर्षे सूट असणार आहे तर OBC प्रवर्गातील उमेदवारांना वयात 3 वर्षे सूट दिली जाणार आहे.
हे वाचा: SBI Clerk Recruitment 2023 : भारतीय स्टेट बँकेमध्ये लिपिक पदांच्या 8 हजार 283 जागांसाठी भरती सुरु.
शुल्क :
SC, ST, PWD प्रवर्ग आणि महिलांसाठी कोणतेही शुक्ल नाही. उर्वरित सर्व प्रवर्गातील उमेदवारांना 100 रुपये शुल्क भरावे लागणार आहे.
नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र आणि गोवा
Post Office Recruitment 2023 : अर्ज कसा आणि कुठे करायचा?
अधिकृत वेबसाईट – येथे पहा
जाहिरात (Notification) – नोकरी संबंधितची अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज – येथे करा.
Post Office Recruitment 2023 : महत्वाच्या तारखा
वरील भरती प्रक्रियेत 11 जून 2023 पर्यंत ऑनलाईन अर्ज दाखल करू शकता. तसेच अर्ज संपादित (Edit) करण्याची तारीख 12 ते 14 जून पर्यंत आहे.
या नोकरी संबंधिताच्या अधिक सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.