NHPC Recruitment 2023 : सध्या संपूर्ण जगात आर्थिक मंदीचं संकट आणखी गडद होत चाललं आहे. परिणामी अनेक मोठ्या जागतिक कंपन्यांनी नोकर कपातीचा सपाटा चालूच ठेवला आहे. त्यामुळे अनेक होतकरू कर्मचाऱ्यांना कौशल्य असताना देखील आपल्या नोकरीवर पाणी सोडावं लागलं आहे. अशा परिस्थितीत पुन्हा नोकर भरती सुरु होईल का नाही? असा प्रश्न उपस्थित असताना तरुणांसाठी आता महत्वाची बातमी समोर आली आहे. नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन लि. मध्ये महत्वाच्या पदांवरती भरती करण्यात येणार (NHPC Recruitment 2023) आहे. भरती होणार आहे. या भरती प्रक्रिया अंतर्गत अनेक महत्वाची पदे भरण्यात येणार आहे. तसेच शैक्षणिक पात्रता ही पदांनुसार वेगवेगळी असणार आहे. जाणून घेऊयात या भरती प्रक्रियेबाबतची सविस्तर माहिती…
NHPC Recruitment 2023 : नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशनमध्ये भरती सुरु
भारत सरकारची पेरेंट कंपनी असणाऱ्या नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन लि. मध्ये जवळपास चारशे जागांवरती भरती होणार आहे. कंपनीने भरण्यासंबंधितची एक जाहिरात प्रसिद्ध केली आहे. कंपनीने प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार या भरती प्रक्रियेमध्ये पदवीधरांपासून इंजिनियरिंग पर्यंत शिक्षण घेतलेले उमेदवार अर्ज दाखल करू शकतात. पंरंतु शैक्षणिक पात्रता ही पदांनुसार वेगवेगळी असणार आहे. ही भरती प्रक्रिया कशी राबविण्यात येणार आहे? याबाबतची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे…
हे वाचा: SIDBI Recruitment 2023 : भारतीय लघु उद्योग विकास बँकेत भरती सुरु'; असा करा अर्ज
NHPC Recruitment 2023 : भरतीबाबतची संपूर्ण माहिती खालीलप्रमाणे –
या भरती प्रक्रियेमध्ये भाग कसा द्यायचा? पदांनुसार नेमकी पात्रता काय आहे? अर्ज कसा आणि कुठे करायचा? याबाबतची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे दिलेली आहे.
पदाचे नाव आणि तपशील :
पद क्र. | पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता | पद संख्या | एकूण जागा |
1 | ज्युनियर इंजिनिअर (सिव्हिल) | 60% गुणांसह सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा [SC/ST/PwBD: 50% गुण] | 149 | |
2 | ज्युनियर इंजिनिअर (सिव्हिल) | 60% गुणांसह इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा [SC/ST/PwBD: 50% गुण] | 74 | |
3 | ज्युनियर इंजिनिअर (मेकॅनिकल) | 60% गुणांसह मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा [SC/ST/PwBD: 50% गुण] | 63 | |
4 | ज्युनियर इंजिनिअर (E & C) | 60% गुणांसह इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन्स इंजिनिअरिंग डिप्लोमा [SC/ST/PwBD: 50% गुण] | 10 | |
5 | सुपरवाइजर (IT) | (1) 60% गुणांसह पदवीधर + DOEACC ‘A’ कोर्स किंवा 60% गुणांसह कॉम्प्युटर सायन्स/IT डिप्लोमा किंवा BCA/B.Sc. (कॉम्प्युटर सायन्स/IT)
(2) 01 वर्ष अनुभव [SC/ST/PwBD: 50% गुण] |
09 | |
6 | सुपरवाइजर (सर्व्हे) | 60% गुणांसह सर्वेक्षण / सर्वेक्षण इंजिनिअरिंग डिप्लोमा [SC/ST/PwBD: 50% गुण] | 19 | |
7 | सिनियर अकाउंटेंट | Inter CA किंवा Inter CMA | 28 | |
8 | हिंदी ट्रांसलेटर | इंग्रजी सह हिंदी पदव्युत्तर पदवी | 14 | |
9 | ड्राफ्ट्समन (सिव्हिल) | ITI [ड्राफ्ट्समन (सिव्हिल)] | 14 | |
10 | ड्राफ्ट्समन (इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल) | ITI [ड्राफ्ट्समन (इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल)] | 08 | |
388 |
वयोमर्यादा :
या भरती प्रक्रियेत अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वयवर्ष 30 जून 2023 रोजी 18 ते 30 वर्षे या दरम्यान असणे आवश्यक आहे. SC आणि ST या प्रवर्गातील उमेदवारांना वयात 5 वर्षे सूट असणार आहे तर OBC प्रवर्गातील उमेदवारांना वयात 3 वर्षे सूट दिली जाणार आहे.
हे वाचा: Krushi Sevak Bharti 2023 : राज्यात ‘कृषी सेवक’ पदाच्या 2 हजार जागांसाठी भरती सुरु.
नोकरी ठिकाण : भारतात कुठेही किंवा परदेशात.
NHPC Recruitment 2023 : अर्ज कसा आणि कुठे करायचा?
जाहिरात (Notification) – नोकरी संबंधितची अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लीक करा.
ऑनलाईन अर्ज – येथे Click करा.
NHPC Recruitment 2023 : महत्वाच्या तारखा
वरील भरती प्रक्रियेत 30 जून 2023 पर्यंत ऑनलाईन अर्ज दाखल करू शकता. तसेच परीक्षा कधी आहे? याची तारीख नंतर कळविण्यात येणार आहे.
या नोकरी संबंधिताच्या अधिक सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.