Digital Payment System : UPIद्वारे पैसे देताय ??
PhonePay, G-Pay, PayTM असे Apps डिजिटल पेमेंट करण्यासाठी तुम्ही वापरता का?
तुम्ही डिजिटल पेमेंट (Digital Payment) करता का? उत्तर नक्कीच हो असेल.
हे वाचा: Upcoming Tata SUV Cars 2023 : टाटाच्या नव्या SUV कार लाँच होणार..! कोणत्या आहेत 'या' SUV Cars?
आजकाल भाजीपासून मोठ्या इलेक्ट्रॉनिक गोष्टी खरेदी करण्यापर्यंत सगळेच जण डिजिटल पेमेंट करतात.
डिजिटल पेमेंट म्हणजे चुटकीने पैसे ट्रान्सफर करणे. आपल्या खात्यातून समोरच्याच्या खात्यात पैसे तात्काळ जमा.
डिजिटल पेमेंट्स UPIने करण्यासाठी तुमच्या फोनमध्ये जर PhonePay, G-Pay, PayTM असे Apps असतील तर काय काळजी घ्याल.
१ – तुमचा फोनला स्क्रीनलॉक, फिंगरप्रिंट लॉक, पिन लॉक असणे आवश्यक आहे.
२ – डिजिटल पेमेंट सिस्टीमसाठी सर्वात महत्वाचा भाग म्हणजे UPI Pin. तो कुठेही लिहून ठेवू नका किंवा फोन मध्ये सेव्ह पण करून ठेवू नका.
३ – कुठल्याही संशयास्पद किंवा अनोळखी लिंकवर क्लिक करू नका. पेमेंट रिसिव्ह करण्यासाठी किंवा देण्यासाठी अश्या लिंक आपल्या मोबाईल मध्ये ओपन करू नका.
४ – जे कोणते UPI App वापरत असाल ते नियमितपणे अपडेट ठेवणे आवश्यक आहे. हे Apps त्यांची सिक्युरिटी सिस्टीम आणि सेफ्टी फीचर्स नेहमी अपडेट ठेवत असतात. त्यासाठी आपल्या मोबाईल मधले Apps कायम अपडेटेड ठेवा.
५ – पैसे पाठवण्यापूर्वी कायमच UPI ID चेक करावा.
UPI ही पैसे पाठवण्यासाठीची अत्यंत सोपी आणि सुटसुटीत प्रणाली आहे.
ही भारतात तयार झाली असून आता भारताकडून अनेक राष्ट्रांनी ती यंत्रणा स्वीकारली आहे.
UPI ही क्रांतिकारी पेमेंट सिस्टीम आहे आणि तिचा जगावर आर्थिक क्षेत्रावर मोठा सकारात्मक परिणाम झालेला असला तरी वापर करणाऱ्यांनी काळजीपूर्वक वापर करणे अत्यावश्यक आहे.