Thursday , 28 November 2024
Home Jobs Contract Recruitment : शासकीय पदांवर भरती
Jobsघडामोडी

Contract Recruitment : शासकीय पदांवर भरती

Contract Recruitment : शासकीय पदांवर Contract भरती

नोकरी ही सर्वांसमोरील मोठी समस्या आहे. बेरोजगार तरुणांना तर रोज उठल्यावर हाच प्रश्न समोर असतो.
नोकरी कधी मिळेल? कोणती मिळेल? कायमस्वरूपी असेल की कंत्राटी असेल? सरकारी असेल की खाजगी? अश्या असंख्य प्रश्नांनी पिढ्या त्रस्त झालेल्या आहेत.

नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार, राज्य शासनाने १३८ संवर्गातील शासकीय पदे कंत्राटी पद्धतीने भरली जाणार असल्याचा GR काढला आहे. ही पदे खाजगी कंत्राटदारांमार्फत भरली जाणार आहेत.

हे वाचा: Central Bank of India Recruitment 2023 : सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये मोठी भरती सुरु; असा करा अर्ज.

खाजगी कंपन्यांमार्फत कॉन्ट्रॅक्ट च्या माध्यमातून ही शासकीय पदे भरली जाणार आहेत.

राज्य शासनाच्या अखत्यारीत येणाऱ्या विविध विभागांच्या अंतर्गत ही भरती होणार आहे. रिक्त पदांची संख्या जास्त असल्याने कामाचा ताण कार्यरत असलेल्या लोकांवर जास्त पडतो. ही भरती झाल्याने कामाचा वेग वाढेल अशी अशा निर्माण झाली आहे.

अभियंत्यांपासून शिपायांपर्यंत ही भरती केली जाणार आहे. काही निवडक कंपन्याच ह्या भरतीसाठी निवडल्या गेल्या आहेत. शासकीय कंत्राटी भरतीसाठी ९ खाजगी कंपन्यांना कंत्राट देण्यात आलेले असून त्यांच्या मार्फत ही भरती होणार असल्याचे समजले. ज्या विभागात भरती होणार आहे त्या विभागाच्या मंत्रानी त्या भरतीवर लक्ष ठेवायचे असल्याचे समजते. ह्या खाजगी ९ कंपन्यांना भरती करण्यासाठी दरमहा १५% कमिशन देण्यात येणार आहे. सदरील भरती संदर्भात काम करणाऱ्या कंपन्या ५ वर्षासाठी 5 years contract करारबद्ध असतील.

ह्या भरतीसाठी कोणत्याही प्रकारचे आरक्षण असणार नाही असेही स्पष्ट करण्यात आलेले आहे.

Related Articles

MUCBF Recruitment 2024
Jobs

MUCBF Recruitment 2024 : बँकेत नोकरी करण्याची संधी; अर्ज कसा आणि कुठे करायचा? जाणून घ्या

MUCBF Recruitment 2024 : तरुणांना बँकेत नोकरी करण्याची मोठी संधी आहे. महाराष्ट्र...

AIIA Recruitment 2024
Jobs

AIIA Recruitment 2024 : अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेमध्ये भरती सुरु; असा करा अर्ज.

AIIA Recruitment 2024 : तरुणांना नोकरी करण्याची संधी आहे. आखिल भारतीय संस्थेमध्ये...

BIS Recruitment 2024
Jobs

BIS Recruitment 2024 : भारतीय मानक ब्यूरो मध्ये भरती सुरु; अर्ज कसा आणि कुठे करायचा? जाणून घ्या

BIS Recruitment 2024 : तरुणांना सरकारी नोकरी करण्याची महत्वाची संधी आहे. भारतीय...

SBI Clerk Recruitment 2023
Jobs

SBI Clerk Recruitment 2023 : भारतीय स्टेट बँकेमध्ये लिपिक पदांच्या 8 हजार 283 जागांसाठी भरती सुरु.

SBI Clerk Recruitment 2023 : बँकेमध्ये नोकरी करण्याचं स्वप्न असणाऱ्या तरुणांसाठी भारताची...