policy – LetsTalk https://myletstalks.in Lets Grow! Mon, 13 Mar 2023 12:39:04 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.4.3 https://myletstalks.in/wp-content/uploads/2023/03/cropped-new-logo-scaled-1-32x32.jpg policy – LetsTalk https://myletstalks.in 32 32 LIC of India : एलआयसीच्या ‘या’ पॉलिसी म्हणजे नफ्याची हमी, चांगले व्याज आणि कर सूट फिक्स… https://myletstalks.in/lic-of-india/ https://myletstalks.in/lic-of-india/#respond Mon, 13 Mar 2023 12:38:30 +0000 https://myletstalks.in/?p=378 LIC of India : भारतीय आयुर्विमा महामंडळ अर्थात एलआयसी आपल्या ग्राहकांसाठी विविध योजना चालवते. अशा पॉलिसीमध्ये गुंतवणूक केल्याने तुम्हाला तीन प्रकारे फायदे मिळतात. एक म्हणजे करमाफीचा लाभ, दुसरा चांगला परतावा आणि तिसरा संपूर्ण कुटुंबासाठी विमा संरक्षण. एलआयसीकडे अशा 3 विमा पॉलिसी आहेत, ज्या खरेदी करून तुम्ही आयुष्यभर निश्चिंत राहू शकता. ही पॉलिसी मुलापासून ते वृद्धापर्यंत […]

The post LIC of India : एलआयसीच्या ‘या’ पॉलिसी म्हणजे नफ्याची हमी, चांगले व्याज आणि कर सूट फिक्स… appeared first on LetsTalk.

]]>
LIC of India : भारतीय आयुर्विमा महामंडळ अर्थात एलआयसी आपल्या ग्राहकांसाठी विविध योजना चालवते. अशा पॉलिसीमध्ये गुंतवणूक केल्याने तुम्हाला तीन प्रकारे फायदे मिळतात. एक म्हणजे करमाफीचा लाभ, दुसरा चांगला परतावा आणि तिसरा संपूर्ण कुटुंबासाठी विमा संरक्षण. एलआयसीकडे अशा 3 विमा पॉलिसी आहेत, ज्या खरेदी करून तुम्ही आयुष्यभर निश्चिंत राहू शकता.

ही पॉलिसी मुलापासून ते वृद्धापर्यंत गुंतवणुकीची संधी देते. यापैकी एक पॉलिसी लोकांना इतकी आवडली की, लॉन्च झाल्यानंतर काही वेळातच 50 हजारांहून अधिक लोकांनी ती खरेदी केल्याचे दिसून आले होते. एलआयसी नवीन जीवन आनंद, एलआयसी जीवन उमंग आणि चिल्ड्रन मनी बॅक प्लॅन. या तिन्ही पॉलिसी गुंतवणूकदारांना सुरक्षिततेसह हमी परतावा देतात. त्याबाबत अधिक सविस्तर जाणून घेऊयात..

हे वाचा: The Dress Style Influencers are Wearing Right Now

एलआयसी नवीन जीवन आनंद : ही एक उत्तम पॉलिसी आहे. कारण येथे तुम्हाला अनेक फायदे मिळतात. या योजनेतील गुंतवणुकीवर तुम्हाला चांगला परतावा मिळतो. यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी अर्जदाराचे वय 18 ते 50 वर्षे असावे. योजनेतील परिपक्वतेचे वय 75 वर्षे आहे. यात गुंतवणूक केल्‍याने तुम्हाला सम अॅश्युअर्डची सुविधा देखील मिळते. यासोबतच तुम्हाला कर सवलतीचाही लाभ मिळतो. याशिवाय या योजनेत तुमच्याकडे पॉलिसी सरेंडर करण्याचा पर्यायही आहे.

एलआयसी जीवन उमंग : या पॉलिसीमध्ये चांगला परतावा मिळतो. यामध्ये अर्जाचे वय 90 दिवस ते 55 वर्षे दरम्यान असावे. यामध्ये तुम्हाला कर सवलतीचा लाभही मिळतो. ही एक एंडॉवमेंट योजना आहे. जर पॉलिसीधारकाचा मृत्यू झाला तर नॉमिनीला सर्व पैसे मिळतात. या पॉलिसीमध्ये तुम्हाला 2 लाख रुपयांची विमा रक्कम देखील मिळते.

एलआयसी न्यू चिल्ड्रेन्स मनी-बॅक प्लॅन : ही योजना खास मुलांसाठी बनवली आहे. यामध्ये मुलांना आर्थिक सुरक्षा मिळते. यामध्ये अर्जाचे वय 0 ते 12 वर्षे दरम्यान असावे. यामध्ये तुम्ही 1 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकता. त्याच वेळी, या योजनेतील मॅच्युरिटीचे वय 25 वर्षांपर्यंत आहे

हे वाचा: 18 फेब्रुवारी 2023 : आज तुमचा दिवस कसा राहिल? वाचा…

The post LIC of India : एलआयसीच्या ‘या’ पॉलिसी म्हणजे नफ्याची हमी, चांगले व्याज आणि कर सूट फिक्स… appeared first on LetsTalk.

]]>
https://myletstalks.in/lic-of-india/feed/ 0
LIC Policy : एलआयसी पॉलिसी बंद करायचीय? अगोदर 2 नियम माहित करुन घ्या. https://myletstalks.in/lic-policy/ https://myletstalks.in/lic-policy/#respond Sat, 25 Feb 2023 07:52:18 +0000 https://myletstalks.in/?p=284 LIC Policy : एलआयसीच्या माध्यमातून अनेक लोकांना बचतीचा सवय लागल्याचे बोलले जाते. यानिमित्ताने काही रक्कम बाजूला पडते. जी अडचणीच्या काळात उपयोगी पडते. तसे तर बाजारात गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत, मात्र LIC ची विश्वासार्हता उजवी ठरते. जर तुम्हीही एलआयसी पॉलिसी केली असेल आणि काही कारणास्तव ती सरेंडर करायची असेल, तर आधी त्याबाबतचे नियम आणि कायदे […]

The post LIC Policy : एलआयसी पॉलिसी बंद करायचीय? अगोदर 2 नियम माहित करुन घ्या. appeared first on LetsTalk.

]]>
LIC Policy : एलआयसीच्या माध्यमातून अनेक लोकांना बचतीचा सवय लागल्याचे बोलले जाते. यानिमित्ताने काही रक्कम बाजूला पडते. जी अडचणीच्या काळात उपयोगी पडते. तसे तर बाजारात गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत, मात्र LIC ची विश्वासार्हता उजवी ठरते. जर तुम्हीही एलआयसी पॉलिसी केली असेल आणि काही कारणास्तव ती सरेंडर करायची असेल, तर आधी त्याबाबतचे नियम आणि कायदे माहिती असायला हवे. एलआयसी पॉलिसी (LIC Policy) मध्येच बंद करणे याला पॉलिसी सरेंडर करणे असे म्हटले जाते. माहितीनुसार तुम्ही किमान 3 वर्षानंतरच LIC पॉलिसी सरेंडर करू शकता. जर तुम्ही 3 वर्षापूर्वी केले तर तुम्हाला पैसे मिळत नाहीत.

हेही वाचा : Stock Market : तरुणांनी स्टॉक मार्केट का शिकावे?

LIC Policy : सरेंडरचे नियम आहेत तरी काय?

पॉलिसी सरेंडर केल्यावर, तुम्हाला एलआयसीच्या नियमांवर आधारित सरेंडर व्हॅल्यू मिळते. म्हणजेच जर तुम्ही पॉलिसी बंद करण्याचा किंवा LIC मधून पैसे काढण्याचा निर्णय घेतला, तर तुम्हाला त्याच्या किमतीएवढी रक्कम परत मिळते, ज्याला सरेंडर व्हॅल्यू म्हटले जाते. जर तुम्ही संपूर्ण तीन वर्षांसाठी एलआयसीचा प्रीमियम भरला असेल, तरच तुम्हाला सरेंडर व्हॅल्यू मिळते.

हे वाचा: Chaturmas : लग्न तिथी कमी, चिंता करु नका; चातुर्मासातही 37 तिथी…

LIC Policy : नक्की किती पैसे मिळतात?

असे बोलले जाते की, पॉलिसी सरेंडर केल्याने ग्राहकांना खूप तोटा सहन करावा लागतो. कारण पॉलिसी मॅच्युरिटीपूर्वी सरेंडर केल्याने मूल्य कमी होते. समजा तुम्ही 3 वर्षांसाठी प्रीमियम भरला असेल तर तुम्ही सरेंडर व्हॅल्यूसाठी पात्र आहात. त्यानंतर तुम्हाला भरलेल्या प्रीमियमच्या फक्त 30टक्के मिळेल परंतु पहिल्या वर्षाचा प्रीमियम मिळणार नाही. म्हणजे पहिल्या वर्षी तुम्ही भरलेले प्रीमियम पैसेही झिरो होतात.

पॉलिसी सरेंडर करण्यासाठी, LIC सरेंडर फॉर्म नंबर 5074 आणि NEFT फॉर्म आवश्यक आहे. यासोबत, तुम्हाला तुमच्या पॅन कार्डची एक कॉपी आणि पॉलिसीच्या मूळ कागदपत्र द्यावी लागेल. तुम्ही पॉलिसी का सोडत आहात? हे हाताने लिहिलेले पत्र देखील लागते.

हे वाचा: Solapur News : कृषिप्रधान राज्यात शेतकऱ्यांची थट्टा..! 10 पोते कांदा विकल्यावर शेतकऱ्याच्या हातात उरले फक्त दोन रुपये.

The post LIC Policy : एलआयसी पॉलिसी बंद करायचीय? अगोदर 2 नियम माहित करुन घ्या. appeared first on LetsTalk.

]]>
https://myletstalks.in/lic-policy/feed/ 0
एलआयसीची धमाकेदार पॉलिसी, 8 वर्षे प्रीमियम भरण्याची गरजच नाही… https://myletstalks.in/lics-bang-policy-no-need-to-pay-premium-for-8-years/ https://myletstalks.in/lics-bang-policy-no-need-to-pay-premium-for-8-years/#respond Sun, 12 Feb 2023 06:10:41 +0000 https://www3.myletstalks.in/?p=110 देशातील सर्वात मोठी विमा कंपनी एलआयसीच्या ग्राहकांची संख्या काही कोटींमध्ये आहेत. असे असले तरी कंपनीकडून नवीन ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध योजना ऑफर केली जात असते. नुकतीच एलआयसीने बचत जीवन विमा पॉलिसी लाँच केली आहे. आता ही योजना काय आहे? त्याचे फायदे काय आहे? याबाबत अधिक सविस्तर जाणून घेऊयात बचत जीवन विमा पॉलिसीमध्ये ग्राहकाला विमा मुदतीपेक्षा […]

The post एलआयसीची धमाकेदार पॉलिसी, 8 वर्षे प्रीमियम भरण्याची गरजच नाही… appeared first on LetsTalk.

]]>
देशातील सर्वात मोठी विमा कंपनी एलआयसीच्या ग्राहकांची संख्या काही कोटींमध्ये आहेत. असे असले तरी कंपनीकडून नवीन ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध योजना ऑफर केली जात असते. नुकतीच एलआयसीने बचत जीवन विमा पॉलिसी लाँच केली आहे. आता ही योजना काय आहे? त्याचे फायदे काय आहे? याबाबत अधिक सविस्तर जाणून घेऊयात

बचत जीवन विमा पॉलिसीमध्ये ग्राहकाला विमा मुदतीपेक्षा 8 वर्षे कमी प्रीमियम भरावा लागतो. या प्लॅनमध्ये एकरकमी रक्कम दिली जाते, ज्याला बेसिक सम अॅश्युअर्ड असेही म्हटले जाते. ते किमान 2 लाख आणि कमाल 5 लाख रुपये आहे. तसेच या पॉलिसीमध्ये एक विशेष गोष्ट आहे जी ती इतरांपेक्षा या पॉलिसीला वेगळी बनवते. यामध्ये तुम्हाला मॅच्युरिटीपेक्षा 8 वर्षे कमी प्रीमियम भरावा लागेल.

एका उदाहरणाद्वारे समजून घेऊयात. समजा तुम्ही 18 वर्षांसाठी पॉलिसी घेतली, तर तुम्हाला फक्त 10 वर्षांसाठी प्रीमियम भरावा लागेल. या पॉलिसीमध्ये, तुम्हाला किमान 2 लाखांची विमा रक्कम मिळते. त्याच वेळी, कमाल रक्कम 5 लाख रुपयांपर्यंत जाऊ शकते. तुम्ही ही पॉलिसी 15 ते 20 वर्षांसाठी खरेदी करू शकता

परतावा किती मिळेल? : जर तुम्ही या पॉलिसीमध्ये 28 वर्षांच्या वयापासून प्रति वर्ष 12 हजार 83 रुपये ठेवण्यास सुरुवात केली आणि जर तुमची योजना 18 वर्षांची आहे, तर मॅच्युरिटीवर तुम्हाला 2 लाखांची विमा रक्कम मिळेल. यामध्ये तुम्हाला 4 ते 5 टक्के व्याज मिळेल. या पॉलिसीमध्ये, मूळ विमा रक्कम किंवा वार्षिक प्रीमियमच्या 7 पट मृत्यू लाभ म्हणून उपलब्ध आहे. यामध्ये, भरायची रक्कम मृत्यूच्या तारखेला जमा केलेल्या प्रीमियमच्या 105 टक्क्यांपेक्षा कमी नाही याची खात्री केली जाते.

एलआयसीचे चेअरमन एमआर कुमार यांनी योजनेबाबत माहिती देताना सांगितले की, ही पॉलिसी लॉंच झाल्यापासून 50 हजार पॉलिसी फक्त 10-15 दिवसांत विकल्या गेल्या आहेत. या पॉलिसीची सुरुवात जानेवारी 2023 मध्ये झाली. कुमार म्हणाले की, कंपनी आपल्या ग्राहकांना चांगल्या सुविधा देण्यासाठी पोर्टफोलिओ मिश्रणावर लक्ष केंद्रित करत आहे. कंपनीने डिसेंबर तिमाहीत 6334 कोटी रुपयांचा नफा कमावला आहे, जो मागील वर्षी याच कालावधीत 235 कोटी रुपये होता. प्रीमियममधून कंपनीचे निव्वळ उत्पन्न देखील 97 हजार 620 कोटी रुपयांवरून 1.1 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढले आहे, असेही त्यांनी सांगितले.

The post एलआयसीची धमाकेदार पॉलिसी, 8 वर्षे प्रीमियम भरण्याची गरजच नाही… appeared first on LetsTalk.

]]>
https://myletstalks.in/lics-bang-policy-no-need-to-pay-premium-for-8-years/feed/ 0