Good news for cattle breeders – LetsTalk https://myletstalks.in Lets Grow! Sat, 11 Feb 2023 07:27:26 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.4.3 https://myletstalks.in/wp-content/uploads/2023/03/cropped-new-logo-scaled-1-32x32.jpg Good news for cattle breeders – LetsTalk https://myletstalks.in 32 32 पशुपालकांसाठी खुषखबर… दुधाळ गायींसाठी 70 तर म्हशींसाठी 80 हजार अनुदान https://myletstalks.in/good-news-for-cattle-breeders/ https://myletstalks.in/good-news-for-cattle-breeders/#respond Sat, 11 Feb 2023 07:27:26 +0000 https://www3.myletstalks.in/?p=102 Cattle breeder पशुपालक शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. कारण आता दुधाळ गायीसाठी 70 तर म्हशीसाठी 80 हजार अनुदान मिळणार आहे. विशेष बाब म्हणजे येत्या 1 एप्रिल पासून ही योजना लागू होणार आहे. यामध्ये जे लाभार्थी चालू वर्षातील असतील त्यांना मात्र जुनेच दर मिळणार आहे. तर नवीन वर्षातील लाभार्थ्यांना वाढीव दराने मदत मिळणार आहे. जर तुम्हाला […]

The post पशुपालकांसाठी खुषखबर… दुधाळ गायींसाठी 70 तर म्हशींसाठी 80 हजार अनुदान appeared first on LetsTalk.

]]>
Cattle breeder

पशुपालक शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. कारण आता दुधाळ गायीसाठी 70 तर म्हशीसाठी 80 हजार अनुदान मिळणार आहे. विशेष बाब म्हणजे येत्या 1 एप्रिल पासून ही योजना लागू होणार आहे. यामध्ये जे लाभार्थी चालू वर्षातील असतील त्यांना मात्र जुनेच दर मिळणार आहे. तर नवीन वर्षातील लाभार्थ्यांना वाढीव दराने मदत मिळणार आहे.

जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर ऑनलाईन अर्ज करावा लागेल. परंतु अजून योजनेचे अर्ज चालू झालेले नाही, हे ध्यानात घ्यावे. येत्या 1 एप्रिल नंतर त्याबाबत कळेल. कारण ही योजना 1 एप्रिल पासून लागू करण्यात येईल. अर्ज कसा करायचा? कुठे करायचा? त्यासंदर्भात संपूर्ण माहिती जाणून घेऊयात…

हे वाचा: Stock Market Today:शॉर्ट सेलिंग म्हणजे काय?

राज्यात दूध उत्पादन वाढीस चालना देणे, दुधाळ जनावरांचे गट वाटपाच्या राज्यस्तरीय तसेच जिल्हा वार्षिक योजनेतील प्रती दुधाळ गायीसाठी 70 हजार रुपये, म्हशीसाठी 80 हजार रुपये खरेदी किमतीचा निर्णय राज्य शासनाने घेतलाय. या सुधारित किमतीनुसार योजनेची अंबलबाजावणी आर्थिक वर्ष एप्रिल 2023-24 पासून सुरू होईल. पशुसंवर्धन विभागाच्या वैयक्तिक लाभच्या दुधाळ जनावरे गट वाटपाच्या राज्यस्तरीय नविण्यापूर्व योजना तसेच जिल्हा वर्षीक योजनेंतर्गत अनुसूचित जाती जमातीच्या लाभार्थ्यांना दुधाळ जनवारांचे गट वाटप केले जाते.

जनावरांचे गट वाटपअंतर्गत वाटप करावयाच्या प्रती दुधाळ देशी, संकरीत गाईची किमत आता 40 हजार ऐवजी 70 हजार रुपये तर म्हशीची किमत 40 हजार ऐवजी 80 हजार रुपये करण्यात आली आहे. यानुसार लाभार्थ्यांना दुधाळ जनवारांचे गट वाटप करण्यात येईल. 2022-23 या आर्थिक वर्षासाठी 199 शेळी गटाचे उद्दिष्ट आहे . यासाठी 2 कोटीचा निधी प्राप्त झाला आहे. तसेच दुधाळ गटाचे उद्दिष्ट 470 आहे, त्यासाठी 3 कोटी निधी प्राप्त झाला आहे. समाजकल्याण राज्यस्तरावर हा निधी मंजूर झालेला आहे .

कोणत्या लाभार्थ्याला किती अनुदान? : या योजनेंतर्गत दुधाळ गटाच्या अनुसूचित जातीच्या लाभार्थ्याला 75 टक्के अनुदान दिले जाईल. तर नविण्यापूर्व खुल्या प्रवर्गातील लाभार्थ्यांना 50 टक्के तर अनुसूचित जातीच्या लाभार्थ्यांना 75 टक्के अनुदान आहे. 2011 पासून गायी म्हशीचे दर 40 हजार रुपये होते. तर विशेष गटाच्या लाभार्थ्याला 75 टक्के तर अन्य गटाच्या लाभार्थ्याला 50 टक्के सबसिडी होती. दरम्यान बाजारातील प्रचलित दर व नागरिकांची मागणी लक्षात घेऊन शासनाने दुधाळ गायीसाठी 70 तर म्हशीसाठी 80 हजार रुपये खरेदी किमतीचा निर्णय घेतला. त्यामुळे मोठ्या रक्कमेच्या अनुदानाचा लाभ संबधित पशुपालकांना होईल, मात्र सुधारित दर पुढील आर्थिक वर्षात लागू होणार आहेत.

हे वाचा: The Supreme Court Has a Perfectly Good Option in Most Divisive

योजनेसाठी अर्ज कसा कराल? : शासनाच्या https://ah.mahabms.com/ या अधिकृत संकेतस्थळावरून ऑनलाईन अर्ज करा. सध्या 2022-23 या वर्षातील योजनेचे अर्ज प्रक्रियेत आहे तर जनवारांचे सुधारित दाराबाबतची योजना 1 एप्रिल 2023 पासून सुरू होईल.

The post पशुपालकांसाठी खुषखबर… दुधाळ गायींसाठी 70 तर म्हशींसाठी 80 हजार अनुदान appeared first on LetsTalk.

]]>
https://myletstalks.in/good-news-for-cattle-breeders/feed/ 0