Gujarati Breakfast : गुजरात हे पश्चिम भारतातील राज्य. समृद्ध सांस्कृतिक वारसा अन स्वादिष्ट खाद्यपदार्थांसाठी ओळखले जाणारे राज्य. गुजरातमधील काही लोकप्रिय नाश्त्याचे पर्याय :
हे वाचा: Send WhatsApp messages without saving number : नंबर सेव्ह न करता WhatsApp वर मेसेज कसा करायचा?
फाफडा-जलेबी
फाफडा हा बेसनापासून बनवलेला कुरकुरीत नाश्ता आहे. मुखत्वे करून जिलेबीसोबत खाल्ला जाणारा हा पदार्थ आहे. फाफडा सोबत तळलेली मीठ लावलेली मिरची पण काही जणांना आवडते.
हे वाचा: Top 5 Trending Smartphones : गेल्या 2 महिन्यांतील भारतातील टॉप ट्रेंडिंग फोन
Gujarati Breakfast : ढोकळा
भारतभर मिळणार ढोकळा हा एक चवदार असा नाश्ता आहे. डाळीच्या पिठापासून तयार होणारा हा वाफवलेले पदार्थ पोट भरणारा आहे. हिरवी चटणी आणि आंबट गोड अशी चिंचेची चटणी अन सोबत मस्त पैकी तळलेली मिरची. ढोकळा हा स्वादिष्ट नाश्ता पर्याय आहे जो सर्व वयोगटात आवडीने खाल्ला जातो. ढोकळ्याचे आजकाल विविध प्रकारही फेमस झाले आहेत.
Gujarati Breakfast : खमण
खमण हा बेसनापासून बनवलेला मऊ आणि फुगलेला नाश्ता आहे जो सामान्यत: वाफवला जातो आणि हिरव्या चटणीबरोबर दिला जातो. हा गुजरातमधील घरोघरी होणारा लोकप्रिय नाश्ता आहे.
हेही वाचा : What is Fiscal Deficit? : वित्तीय तूट म्हणजे काय?
Gujarati Breakfast : थेपला
थेपला हा एक प्रकारचा असा पराठा जो मिश्र पीठं, बारीक चिरलेली मेथीची पाने आणि इतर चवदार मसाल्यापासून बनवला जातो. चटकदार लोणचे किंवा दह्यासोबत हा थेपला मस्त रंगत आणतो. गुजराती लोकांमधला घरोघरी आवडीने खाल्ला जाणारा हा पदार्थ प्रवासात बांधून नेण्यासाठी पण उत्तम असा आहे.
Gujarati Breakfast : हँडवो
हँडवो हा पदार्थ विविध पीठं, डाळी आणि भाज्यांपासून केला जातो. हा पदार्थ वाफेवर शिजवतात किंवा केक सारखा बेक देखील केला जातो. पौष्टिक आणि पोट भरणारा हा पदार्थ लहान थोर सगळ्यांना आवडतो.
उंधियो
उंधियो हा एक पारंपारिक गुजराती डिश आहे जो विविध भाज्या आणि वेगवेगळ्या मसाल्यांच्या मिश्रणातून बनवला जातो. पुरी किंवा पराठ्यासोबत उंधियो वाढला जातो.
गुजराती माणूस हा खवैय्या समजला जातो. रोजच्या नाश्त्यात खाकरा, पुऱ्या, चिवडा अश्या अनेक पदार्थांची रेलचेल नाश्त्यात नियमित असते.